आजच्या शाळा आणि पाठ्यपुस्तके आजच्या जगासाठी मुलांना तयार करत आहेत का?
विदासंकलन आणि विश्लेषण : विनय, निलेश, अंजली, कांचन, प्रशांत, पायल, गणेश ७ वर्षांपूर्वी एका गावात सुदीपला भेटलो (बदललेले नाव), वय वर्षे २६. सुदीप आणि त्याचा भाऊ १०वीपर्यंत सोबत शिकले. त्याच्यानंतर घरातील आर्थिक परिस्थिती फार चांगली नसल्यामुळे दोघांपैकी एकाचेच शिक्षण शक्य होते. घरातील हुशार मुलगा म्हणून सुदीपचे शिक्षण सुरू ठेवले आणि दुसऱ्या भावाने शेतीची जबाबदारी घेतली. …